नवीन वर्षाच्या पावन पर्वावर स्वराज रक्षक न्यूज तर्फे समस्त खानदेशवासीयांना, आमच्या राज्यातील व देशातील सर्व निष्ठावान वाचक प्रेमींना, हितचिंतकांना, पत्रकार बांधवांना तसेच समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य, नवी उमेद, नवी दिशा आणि नवे यश घेऊन येवो. सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद, सुख-समृद्धी, सामाजिक सलोखा व समाधान नांदो, तसेच समाजहिताचे, राष्ट्रहिताचे कार्य अधिक जोमाने घडो, हीच आमची प्रामाणिक सदिच्छा आहे.
निर्भीड, सत्यनिष्ठ व लोकाभिमुख पत्रकारितेचा संकल्प
सत्य, निर्भीडता, पारदर्शकता व सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपत स्वराज रक्षक न्यूज नेहमीच सामान्य जनतेचा आवाज बनून कार्य करत आहे. जनतेचे प्रश्न, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, युवक तसेच वंचित घटकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही प्रामाणिकपणे करत आलो आहोत.
नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वराज रक्षक न्यूज परिवार पुन्हा एकदा हा संकल्प करीत आहे की,
-
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे,
-
सत्य बातमी निर्भीडपणे मांडणे,
-
समाजातील सकारात्मक घडामोडींना प्रोत्साहन देणे,
-
आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे,
हे कार्य भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू ठेवले जाईल.
वाचकांचे प्रेम हीच आमची ताकद
आमच्या असंख्य वाचकांनी दिलेले प्रेम, विश्वास, पाठिंबा व मार्गदर्शन हेच स्वराज रक्षक न्यूज चे खरे बळ आहे. वाचकांच्या अपेक्षांवर खरे उतरून अधिक दर्जेदार, विश्वासार्ह व लोकाभिमुख पत्रकारिता देण्याचा आमचा सतत प्रयत्न राहील.
नवीन वर्षातही आपले सहकार्य, आशीर्वाद व प्रेम असाच कायम राहो, हीच नम्र अपेक्षा व्यक्त करीत आहोत.
— स्वराज रक्षक न्यूज परिवार
मुख्य संपादक :
✍️ विजय पाटील
📞 8007924944
कार्यकारी संपादक :
✍️ प्रा. हिरालाल पाटील
📞 9011425075

