अमळनेर मध्ये घुमला संत सेवालाल महाराजांचा जयघोष
अमळनेर : –
तालुक्यातील नऊ तांड्यातील बंजारा समाज बांधव विश्रामगृह अमळनेर येथे बंजारा पारंपारिक वेशभूषेत हजारोच्या संख्येने एकवटले होते.
प्रथम सेवालाल महाराजांच्या रथाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.पांढरा ध्वज हाती घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या बंजारन रोशनी पवारने सगळयांचे लक्ष वेधून घेतले.सर्व समाज बांधव डीजेच्या ठेक्यावर बंजारा पारंपारिक वेशभूषेत नाचत गाजत संपूर्ण अमळनेर शहर दणाणून सोडले.त्यानंतर दोडे गुजर भवनांमध्ये बंजारा संस्कृती प्रमाणे संत श्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापिका वैशालीताई राठोड व अमळनेरचे एपीआय देसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.मा श्रावण चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा क्रांती दल नंदुरबार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.मा.एकनाथ जाधव यांनी बंजारा सक्षेला मधुर आवाजात गाऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.त्यानंतर भिका भाऊ यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला भोग दाखविण्यात आले.
मानवतेची शिकवण देणारे, थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जीवनपटावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे इयत्ता बारावीच्या मुलींनी बंजारा साहित्य संस्कृतीचे दर्शन आपल्या नृत्यामधून करून दाखविले.
त्याप्रसंगी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किरण जाधव,,प्रकाश पवार सर,भिका भाऊ, एकनाथ जाधव,राम पवार साहेब,अनिल जाधव सर,किशोर पवार,राहुल राठोड,रमेश पवार,राहुल चव्हाण,संजय राठोड,राजेश राठोड सर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश राठोड यांनी केले तर आभार किरण जाधव यांनी मानले.
