
*जळगाव*: विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी अमळनेरचे नगरसेवक प्रवीण गंगाराम पाटील उर्फ राजुदादा फापोरेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे, तसेच प्रवीण गंगाराम पाटील यांच्यासह एकूण १४ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली असून, अंतिम लढत कोणामध्ये होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
