जी.एस.हायस्कूल येथे १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
अमळनेर:-
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी शाळेचे चेअरमन आण्णासाहेब हरी भिका वाणी हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने,सी.एस.सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ,मुख्य लिपिक शाम पवार उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना १० वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात सर्वच विषयांचे सविस्तर सोबतच उत्तरपत्रिका लेखनाचे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाच्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला.सूत्रसंचालन आर.जे.पाटील यांनी केले तर आभार एन.जे.पाटील यांनी मानले.

