सर्जेराव पाटील यांची राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष पदी निवड –
अमळनेर :- खर्दे ता. अमळनेर येथील सर्जेराव भाईदास पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी अजित पवार गट किसान सेल तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सर्जेराव पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, ज्ञानेश्वर महाजन हे उपस्थित होते. सर्जेराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात प्रामाणिक पणे काम केल्याने आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीने राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, प्रवीण पाटील, दीपक पाटील, भैय्यासाहेब पाटील, पंकज पाटील, ज्ञानेश्वर बापू, भूषण भदाणे,सोनू पाटील, तारकेश्वर पाटील, नरेंद्र पाटील, पप्पू दादा, भूपेश पाटील, सुनील पवार,अमृत पाटील, चतुर पाटील, लोटन पाटील, नितीन पाटील, भैय्यासाहेब पाटील, भूषण पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

