महात्मा फुले हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !…
सत्यशोधक समाज संघाचा सामाजिक उपक्रम !…
मोठ्या गटात नंदिनी भोई तर लहान गटात खुशी भोई प्रथम !…
धरणगाव प्रतिनिधी –
शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित “स्त्री सन्मान मार्ग ” प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ३ जानेवारी सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधत सत्यशोधिका ललिता राजेंद्र वाघ यांनी पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” हे छोटे पुस्तक भेट दिले होते. मुलांनी पुस्तकाचे वाचन केले व त्यावर आधारित २५ गुणांची प्रश्नपत्रिका काढण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. लहान गटात प्रथम – खुशी भोई, द्वितीय – भावेश गवळे, तृतीय – कृष्णा महाजन, प्राची करोसिया व मोठ्या गटात प्रथम – नंदिनी भोई, द्वितीय – जया सोनवणे, तृतीय – दिव्या भोई व मयुरी भोई आली. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना महापुरुषांचे ग्रंथ व सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका भेट स्वरूपात देण्यात आली.
या प्रश्नमंजुषाचे मुख्याध्यापक पवार यांनी स्वागत केले या पुस्तकाच्या माध्यमातून या महामातांचे जीवन कार्य मुलांपर्यंत पोहोचले. हे आदर्श महामाता हे पुस्तक मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ते पुस्तक अभ्यासून महामातांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पवार यांनी केले. या प्रश्नमंजुषाचे आयोजन सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष व आदर्श महामाता या पुस्तकाचे लेखक पी डी पाटील यांनी संपूर्ण धरणगाव तालुक्यात विविध शाळांमध्ये केलेले आहे. प्रश्नमंजुषा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

