मुडी प्र. डांगरी येथे वाळू वाहून नेणारे तीन ट्रॅक्टर पकडले, महसूल प्रशासनाची मोठी कारवाई
अमळनेर:-
तालुक्यातील मुड़ी प्र.डांगरी येथे महसुलच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केली आहेत.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. ट्रॅक्टर मुद्देमालासह अमळनेर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. पथकात पी. एस. पाटील( मंडळ अधिकारी वावडे), व्ही. पी.पाटील( मंडळ अधिकारी नगांव), ए बी सोनवणे( ग्राम महसूल अधिकारी), आशिष पारधे (ग्राम महसूल अधिकारी), जितेंद्र पाटील( ग्राम महसूल अधिकारी), एम आर पाटील (ग्राम महसूल अधिकारी) यांचा समावेश होता. या कारवाईत मनोज देडगे याच्या मालकीचे MH 19 BG 4665 ट्रॉली नंबर नसलेली लाल रंगाची, शुभम सूर्यवंशी याच्या मालकीचे Mh 18 BX 5866 ट्रॉली नंबर नसलेली हिरव्या रंगाची , सुनील भील याच्या मालकीचे नवीन पासिंग ट्रॉली नंबर MH 19 AN 7636 ही तीन ट्रॅक्टर जमा करण्यात आली आहेत.
महसूल प्रशासनाने या केलेल्या मोठ्या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणालले आहे.

