विद्यार्थी वेदांत पाटील याने सोनगीर- अमळनेर बस प्रवासात सापडलेले पाकीट केले परत
अमळनेर :-
येथील पत्रकार सत्तार खान हे अमळनेर -सोनगीर बस मध्ये प्रवास करीत असताना प्रवासात त्यांचे पाकीट बस मध्ये यावेळी वेदांत महेश पाटील विद्या विहार कॉलनी अमळनेर या शाळकरी मुलाला सापडल्यावर त्याने हे पाकीट कोणाचे आहे असे सूचना दिली मात्र वडिलांनी मोबाईल वरून संपर्क साधल्यावर वरून विद्यार्थ्याचे वडील महेश पाटील यांनी पत्रकार यांना समक्ष भेटून पॉकिटामध्ये रोख रक्कम १००० (एक हजार )रूपये होते व आधार कार्ड पॅन कार्ड व इतर महत्वाचे कागदपत्र देऊन पत्रकार सत्तार खान यांनी वेदांतला त्यांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून शंभर रुपये बक्षीस देऊ केले मात्र त्याने तेही घेतले नाही.विद्यार्थी वेदांत याच्यावर चांगले संस्कार असल्यामुळे हे पाकीट सत्तारखान यांना परत मिळाले.सत्तार खान यांनी कौतुकाची थाप देऊन त्याचे कौतुकही केले आहे. त्याला सांगितले की, बेटा तुला मी प्रामाणिकपणे मला पॉकेट मिळाले म्हणून मी तुला पेढ्यासाठी शंभर रुपये देत आहे तरी विद्यार्थ्याने मला तुमचे पैसे नको असे सांगितले.यामुळे त्याच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

