दहावी,बारावी प्रात्यक्षिक वेळापत्रक जाहीर
अमळनेर :-
सन -२०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी व बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांनी याबाबत नोंद घ्यावी असे कळविन्यात आले आहे.
यात इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेला ता. ११ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेला ता. २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत होईल.
इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेला ता.२१ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. तर त्यांची प्रात्यक्षिक परीक्षेस ता. ३ फेब्रुवारी पासून ते २० फेब्रुवारी पर्यंत होणार आहे.
यात माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरलेल्या नुसार विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावयाची आहे.

