गांधली येथे विप्रो ऑक्सिजन पार्कला समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास दौरा
अमळनेर :- गांधली ता. अमळनेर येथे ग्रामपंचायत, आधार संस्था अमळनेर आणि विप्रो कंपनीकडून विकसित ऑक्सिजन पार्कला समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी अभ्यास दौरा करीत भेट देऊन पाहणी केली.
यावेळी ऑक्सिजन पार्क विषयी आधार संस्था प्रोजेक्ट मॅनेजर राकेश महाजन, संजय कापडे यांनी मियवाकी तंत्र आणि विप्रो ऑक्सिजन पार्क ची सविस्तर माहिती दिली. समाज कार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ अनिता खेडकर, डॉ सागर राज चव्हाण, प्रा. डी आर ढगे यांचे सह राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि विदयार्थी यांनी तीन तास स्थळ भेट दिली. वॉटर शेड प्रकल्पातून निर्माण झालेल्या जलाशय भेट दिली. यात पाणी आडवा, पाणी जिरवा, वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवून जमिनीतील पाण्याची पातळी कशी वाढवता येईल याबाबत अभ्यास व चर्चाही करण्यात आली.

