सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
अमळनेर :- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्त साधून वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. त्याचबरोबर वार्षिक बक्षीस वितरणाचा ही कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.शाम पवार, प्रशासकीय अधिकारी, नवलभाऊ प्रतिष्ठान, यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी आबासाहेब डी. बी. पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या पालक समितीचे उपाध्यक्ष हेमराज पाटील, संदीप पाटील,महिला पालक प्रतिनिधी शीतल पाटील, ज्युनिअर विभागाचे सुनील पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती गायत्री भदाणे ह्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने आणि सावित्रीमातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. सांस्कृतिक प्रमुख सुनील वाघ यांनी स्वागतगीत सुरेखपणे गायले. त्यानंतर प्रमुख अतिथींचा स्वागत सत्कार पार पडला.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या गायत्री भदाणे यांनी केले. त्यानंतर विद्यालयाच्या उच्च. माध्य. विभागाचे विभाग प्रमुख सुनील डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त सावित्रीमातेचा जीवनपट सांगितला. त्यानंतर उद्घाटक , नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.श्याम पवार यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी ,प्रशासकीय अधिकारी डी .बी .पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनिल गरूड यांनी कार्यक्रमासाठी संदेशाद्वारे आपल्या शुभेच्छा कळवल्यात. त्यानंतर बहारदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बहारदार, मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कलाविष्कार सादर केलेत त्यामुळे सर्वांचे डोळ्यांचे पारणें फिटले. त्यात नृत्य, अभिनय, निवेदन आणि गीतगायन अशा विविध कलांचे दर्शन घडविणारे विद्यार्थी आपले कला गुण अतिशय आनंदाने आणि जोश उल्हासाने सादर करीत होते. सुरुवातीला सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सुनील वाघ यांनी केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी श्रेया पाटील व इयत्ता नववी विद्यार्थिनी प्रतीक्षा पाटील यांनी विनोदी शैलीने केले. गणेश वंदना, लल्लाटी भंडार, सुया घ्या पोत घ्या, गुलाबी साडी, आई भवानी, स्वच्छतेच्या बाबतीत प्रबोधनात्मक नाटिका, सावित्रीबाईच्या ओव्या, दर्या किनारे, ए मेरे वतन, चला जेजुरीला जाऊ, बिबारुची पारू, गुलाबी कळी, सोशल मीडिया ड्रामा, तू ग दुर्गा तू भवानी, आई भवानी तुझ्या कृपेने, काळी बिंदि ,हम है इंडियावाले, लुक झुक जाऊंगी, एकच चाल है , आदिवासी चाल है, पापा कहते है, दोनच राजे इथे गाजले, तुकाराम महाराज नाटिका, नशा मुक्ती ड्रामा, अडाणी बहु, सातनखी मातेचा उदो उदो, भारताचे निशाण आम्ही नाही सोडणार, भारत की बेटी हू, मै कोल्हापूर से आई हु , मिमिक्री, लावणी ,बंजारा गीत, देवा तू सांग ना, आली ठुमकत- नाचत, संदेशे आते है, आपलीच हवा विविध कलाविष्कार विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केलेत. विद्यार्थ्यांचा अभिनय त्यांची वेशभूषा हे एक प्रमुख आकर्षण ठरले होते. सुनील वाघ यांनी आईवर आधारित तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, हया गायलेल्या गीतावर सर्वांचे डोळ्यात अश्रू आले.त्यानंतर सर्वांचा आवडता असा शेलापागोटे चा कार्यक्रम पार पडला त्याचे सूत्रसंचालन जी. पी .हाडपे, समाधान पाटील, दीपक पाटील यांनी केले .सांस्कृतिक कार्यक्रमानंतर वार्षिक बक्षीस वितरणाचाही कार्यक्रम पार पडला. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय विविध क्रीडा स्पर्धा, वकृत्व व निबंध स्पर्धेत बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचाही यावेळेस सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर विभागाचे आर .आर. पाटील, नितीन पाटील व माध्यमिक विभागाचे जी पी हाडपे यांनी केले. या विद्यालयाचे आतापर्यंत वैशिष्ट्य ठरलेला लक्षवेधी असा कार्यक्रम म्हणजे लकी ड्रॉ . त्यात एकूण 40 बक्षिसे ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये कूपन वाटप करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुनिअर कॉलेजचे प्रा. सुनील पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे वृत्तांकन अनिल पाटील यांनी केले तर आभार जुनियर विभागाचे सांस्कृतिक प्रमुख आर आर पाटील यांनी मांनले. अखेरपर्यंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुनिअर विभागाचे व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सांघिक कार्याचे उत्तम उदाहरण दाखवून कमी दिवसात या कार्यक्रमाची सुरेख तयारी करून कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखविला.

