पारोळा येथील मतिमंद विद्यालयातील विध्यार्थ्यांना ड्रेस वाटप –
रोशन पाटील यांचे दातृत्व
पारोळा :-
येथील चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळेत श्री.रोशन ज्ञानेश्वर पाटील, फापोरे ( डायरेक्टर ऑफ क्लिनिकल ऑपरेशन) व्हेक्टर बायोसोर्स इन्क., मॅसॅच्युसेट्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे शाळेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या कुटुंबीयांनसोबत उपस्थित झाले होते.त्यावेळी त्यांचे वडील श्री.ज्ञानेश्वर फकिरा पाटील, काका श्री.रविंद्र नामदेव पाटील आदी उपस्थित होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर यांच्याकडून आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.त्यावेळी शाळेतील विशेष शिक्षक हेमंत महाजन सर यांनी शाळेची माहिती दिली.शाळेला सदिच्छा भेटीनिमित्त रोशन पाटील यांनी शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना ५० ड्रेस उपलब्ध करून दिले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनिष जाधव सरांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. सुत्रसंचालन श्री.जगदीश सोनवणे सर यांनी केले. त्यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

