तांदळी येथील सरपंच पदी रत्नाबाई परदेशी तर उपसरपंच पदी चेतन शिरसाठ
अमळनेर :-
तांदळी ता.अमळनेर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली . यामध्ये सरपंच पदी सौ रत्नाबाई सुनील परदेशी तर उपसरपंच पदी चेतन विनायक शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चैताली परदेशी, कुणाल पाटील,सविता परदेशी, शोबाबाई भिल,रतन भिल उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री शिंदे,तलाठी जितेंद्र जोगी, ग्रामविस्तार अधिकारी समाधान निकम यांनी काम पाहिले. यावेळी येथील ग्रामस्थ शंकर पाटील,गणेश परदेशी,रमेश परदेशी, कपिल परदेशी, उदय पाटील,दिलीप पाटील,वासुदेव तिरमले , सुभाष परदेशी, मगन कोळी,एकनाथ पाटील हितेश परदेशी,नाना परदेशी,योगेश तिरमले यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच रत्नाबाई परदेशी व उपसरपंच चेतन शिरसाठ यांचे तांदळी सह परिसरातील नीम, शहापूर, कळमसरे, भिलाली, पढावद गावातून अभिनंदन होत आहे.

