अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ निवड चाचणी संपन्न
अमळनेर :–
तालुका कुस्तीगीर संघा कडून नुकतीच कुस्ती निवड चाचणी घेण्यात आली. वरीष्ठ गट गादी व माती व वरीष्ठ ग्रीक रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अधिवेशन व महाराष्ट्र केसरी लढत स्पर्धेसाठी तालुका संघ जाहीर करणयात आला.
यावेळी आखाडा पूजन करण्यात आले. संजय कौतिक पाटील , बाळु संतोष पाटील , रावसाहेब पहेलवान यांनी नारळ फोडुन निवड चाचणीला सुरुवात केली . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शब्बीर पैलवान ,प्रताप अशोक शिंपी, संजय पाटील पैलवान, भरत पवार , प्रवीण पाटील, तालुकाध्यक्ष कुस्तीगीर संघ अध्यक्ष बाळु पाटील उपस्थित होते.
निवड संघ पुढील प्रमाणे गादी गट // वरीष्ठ गादी गट पुढील प्रमाणे हर्षल बापु मोरे 57 कि. प्रतिक दिपक पाटील 61 कि. संदीप सुरेश पाटील 65 कि. भाग्येश सुनिल जाधव 70 कि. हर्ष प्रताप शिंपी 74 कि. ऋषिकेश विलास पाटील 79 कि. हरी शेळके 86 कि. निजाम अली हसन अली सय्यद 92 कि. /[माती गट] / जय राजेंद्र पाटील 57 कि. योगराज वंसत चोधरी 65 कि. निखिल संजय गुरव 74 कि. शुभम शिंदे 79 कि. तुषार संजय गुरव 92 कि. ==वरिष्ठ ग्रीक रोमन ओपन गट 18 वर्ष वरील भावेश कोळी 55 कि. यांचा समावेश अमळनेर तालुका संघात करण्यात आला. पंच म्हणुन रावसाहेब पहेलवान ,हसन पहेलवान यांनी काम पाहीले व गुण लेखक म्हणून संजय पाटील व भरत पवार यांनी काम पाहीले. कार्यक्रम यशस्वी करणया साठी बाळु पाटील, प्रशांत पाटील ,किरण चव्हाण ,प्रवीण कुमार पाटील यांनी काम पाहीले.

