कला शिक्षक रांगोळी कार ,चित्रकार, पत्रकार
यश महाजन पुरस्काराने सन्मानित –
इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्डस्
अमळनेर :- कळमसरे ता. अमळनेर येथील यशवंत मधुकर महाजन यांना नुकतेच पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यश महाजन हे श्री.वाणी विद्या शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत यांना कला विषय अध्यापनाचा 18 ते 19 वर्षाचा अनुभव असून ते कला माध्यमातून आपला छंद जोपासतांना विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक इत्यादी विषयावर चित्र,व्यंगचित्र रांगोळी पोट्रेट , माध्यमातून समाज प्रबोधनात्मक संदेश देत कला साधना करत असतात तसेच सारथी महाराष्ट्राचा या वृत्तपत्रासाठी पत्रकारिता पण करतात त्यांना अभिनय, गायन विविध गोष्टींची आवड असून यश महाजन यांच्या कार्याची दखल घेत इंडिया प्राऊड बुक रेकॉर्ड्स हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले त्यासाठी त्यांना त्यांच्या परिवाराकडून ,समाजाकडून शाळेकडून ,कौतुक करण्यात येत आहे.

