नुकसान भरपाई साठी संपर्क साधा
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना गावराणी जागल्याचे आवाहन –
अमळनेर :-
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी ज्वारी या शेतमालाचा केंद्र शासनाने जाहीर केलेला किमान आधारभूत दर ३३७१ असा असतांना ज्वारी या पिकास सर्रास सुमारे २००० ते २२०० पर्यंतचा दर आज रोजी मिळतांना दिसून येत आहे . परिणामी प्रतिक्विंटल रुपये १००० ते १३०० पर्यंतची लूट बिनधास्तपणे शेतकऱ्यांची करण्यात येत आहे.
यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत आहे.परंतु या अन्यायाच्या बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही ही बाब अतिशय खेदजनक , लाजिरवाणी , निंदनीय व लांच्छनास्पद आहे . तरी ज्या शेतकऱ्यांचा ज्वारी हा शेतमाल रुपये २००० – ते २१०० या दरात विकला जात आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या ज्वारी या शेतमाल विक्रीची पावती व ज्वारी या पिकाची पेरणी / लावणी केल्या बाबतची नोंद असलेला सातबारा उतारा यांच्या छायांकित प्रती ७३८५७६८८६० या गावरानी जागल्या सेना अध्यक्ष तथा सत्यशोधक विश्वासराव विठाबाई भास्करराव पाटील यांच्या मोबाईल नंबरवर पाठविल्यास शेतकऱ्यांच्या प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये झालेल्या नुकसानाची भरपाई शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मिळवून देणेसाठी गावरानी जागल्या सेना या संघटनेच्या स्तरावरून न्यायालयीन लढाई स्वखर्चाने अर्थात शेतकऱ्यांकडून कोणतीही रक्कम न घेता लढवली जाणार आहे. तरी या संविधानिक तरतुदींन्वयेच्या न्यायालयीन लढाईत शेतकऱ्यांनी सहभागी होऊन गावरानी जागल्या सेना या संघटनेस उपकृत करावे असे आवाहन गावरान जागल्याचे प्रमुख
सत्यशोधक विश्वासराव पाटील यांनी केले आहे.

