सागर कोळी विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित
अमळनेर :- येथील
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर सुकदेव कोळी यांनी आपत्ती पूर्व प्रशिक्षण शिबिर आव्हान २०२४ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे शिबिरात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली व या निमित्ताने त्यांना डॉ.सचिन नांद्रे सर (संचालक रासेयो,कबचौ,उमवि जळगाव) यांच्या हस्ते सागर कोळी यांना उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी,प्रा.एस. टी.इगंळे,राजेंद्र नन्नवरे, डॉ.विनोद पाटील,डॉ.सचिन नांद्रे, समाजकार्य महाविद्यालय अमळनेर संस्थेचे अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर, प्राचार्य.डॉ.पी.एस.पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.विजयकुमार वाघमारे,डॉ.अनिता खेडकर, प्रा.उदय महाजन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सागर चे कौतुक केले आहे.

