करणखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप
तीन दिवसीय शिबिरात विध्यार्थ्याना मनोरंजनाबरोबर निसर्ग, पर्यावरण, शिक्षण आदींचे ज्ञान
अमळनेर :-
मारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे एनएसएस दत्तक गाव करणखेडा येथे ता. 25 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचा समारोप झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. देविदास शामराव पाटील हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. जयंतराव मन्साराम पाटील,संचालक युवराज काशिनाथ पाटील, विश्वासराव विनायकराव पाटील, राजेंद्र फकीरा पाटील, दिनेश वासुदेव साळुंखे, प्रशासकीय अधिकारी के. व्ही. पाटील ,करणखेडा येथील उपसरपंच महेंद्र सुरेश पाटील, माजी सरपंच सुधाकर यशवंत पवार, गोवर्धन येथील माजी सरपंच श्यामकांत बळीराम पाटील, लक्ष्मण जुलाल पाटील ,सौरभ गुलाबराव भागवत, मधुकर कौतिक पाटील,गणेश शांताराम गुरव, श्री. नंदकिशोर शंकरराव पवार, श्री. दिलीप यशवंत पाटील, श्री.प्रवीण यशवंत पाटील ,श्री. राकेश बारकू पाटील तसेच गावातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.
या कॅम्प मध्ये युथ फाॅर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटलसी, स्वच्छ भारत अभियान विशेष मोहीम, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान ,मतदार जनजागृती अभियान, माय भारत युवा पोर्टल नोंदणी ,जागो ग्राहक जागो, अन्नपदार्थ सुरक्षा जनजागृती मोहीम ,दत्तक गावातील कार्याचा उजाळा इत्यादी नियोजित प्रकल्प पूर्ण करून राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी संस्कार शिबिर संपन्न झाले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण हीने तर प्रास्ताविक एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्हि.डी. पाटील, प्रा. डॉ.नंदा कंधारे प्रा. किशोर पाटील उपस्थित होते.
यावेळी एनएसएस स्वयंसेवकांना
देविदास पाटील, शामकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार कोमल पाटील हिने मानले.
गणेश शांताराम गुरव यांच्याकडून विद्यार्थ्यांना ट्रॉफी भेट देण्यात आल्या.
याप्रसंगी महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

