पातोंडा येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल :-
अमळनेर :-
पातोंडा अमळनेर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन अज्ञात ट्रॅक्टरवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पातोंडा येथे ता.१८ रोजी रात्री अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना मिळताच तलाठी प्रकाश महाजन ,अमोल पाटील ,अमोल चक्रे , पवन शिंगारे ,अमोल गिरी यांना पातोंडा येथे कारवाईसाठी पाठवले. रात्री साडे नऊ वाजता त्यांना वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर जाताना दिसले तलाठ्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र दोन्ही चालक पळून वेगाने रस्त्यात वाळू टाकून निघून गेले. तहसीलदारांच्या आदेशाने वाळूचा पंचनामा करण्यात येऊन प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.

