करणखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न
आठवडाभर शैक्षणिक व बौद्धिक कार्यक्रमांची मेजवाणी –
अमळनेर :-
मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे एनएसएस दत्तक गाव करणखेडा येथे ता. 19 रोजी सकाळी 11 वाजता शहीद कुटुंबाचे सदस्य शरद दिलीप बागुल यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. जयवंतराव मन्साराम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील सचिव देविदास बारकू पाटील, संचालक युवराज काशिनाथ पाटील,विश्वासराव विनायकराव पाटील, लोटन शिवदास पाटील, चंद्रकांत रामराव शिसोदे, मनोज हिम्मतराव साळुंखे, दिनेश वासुदेव साळुंखे, करणखेडा येथील सरपंच
अलकाबाई गुलाबराव धनगर, उपसरपंच महेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम शामराव पाटील, राकेश गुरव, ताराचंद सिताराम सूर्यवंशी,हरिभाऊ नथू मारवडकर,नरेंद्र शांताराम पाटील,कविताबाई महेंद्र पाटील,कविताबाई भानुदास धनगर, उपस्थित होते. तसेच विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा येथील मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही.डी.पाटील यांनी प्रास्ताविक केले, एन. एस. एस. अधिकारी प्रा.डॉ.एस.
एच.पारधी, प्रा.डॉ.नंदा कंधारे महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. डॉ. संजय महाजन यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
हिवाळी श्रम संस्कार शिबिर दैनंदिनी सकाळ सत्र जागर, प्रार्थना ध्यानधारणा योगासने चहापान व अल्पोहार श्रमदान स्वयं स्वच्छता, दुपार सत्र भोजन , गीतमंच ,व्याख्याने दोन तसेच संध्याकाळ सत्र चहापान, मैदानी खेळ व गटचर्चा, भोजन.रात्रीचे सत्र सामाजिक विचार मंथन व दैनंदिन लिखाण तसेच दत्तक गावातील समस्यांवर चर्चा, दीप मालवण इत्यादी.
तसेच दररोज बौद्धिक प्रबोधन- आपत्ती व्यवस्थापन,मूल्य शिक्षण काळाची गरज, स्वच्छ भारत युवा संवाद, इंडियातून भारत निर्माण करणे, विकासातून युवकांचे योगदान,शाश्वत ग्रामविकास, जागो ग्राहक जागो,माझी वसुंधरा, मतदार जनजागृती, मानवी जीवनातील योगाचे महत्व, पाणी व्यवस्थापन, बालविवाह कायदा, बालविवाह थांबवण्यासाठी जनजागृती. यावरील विषयांवर मान्यवर
व्याख्यात्यांचे बौद्धिक प्रबोधन होणार आहे.
सदर राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप ता. 25 रोजी होणार आहे.

