थंडी पासून संरक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप
राणी लक्ष्मी बाई महाविद्यालाची राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक बांधिलकी —-
पारोळा–
पारोळा येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळेत राणी लक्ष्मी बाई महाविदयालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्राध्यापक यांच्यासह विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी ब्लँकेट वाटप केले.
या कार्यक्रमाला राणी लक्ष्मी बाई महाविद्यालयाचे संचालक ऍड. रोहन मोरे यांची उपस्थिती होती. त्यांनी योजनेची महत्त्वाची भूमिका स्पष्ट करीत सामाजिक बांधिलकीतून समाज सेवा हाच मंत्र आपण प्रत्येकानी जोपासला पाहिजे असे यावेळी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्याकडून आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटले की,या दिव्यांग विध्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप नव्हे तर त्यांना मायेची ऊब आपण सर्व एकत्र येऊन सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थंडीपासून संरक्षणाची ही कृती एक आदर्श उदाहरण आहे जे दर्शवते की आपल्यातील संवेदनशीलता व स्नेहाच्या धाग्यांनी कसे समाजातील विविध घटक एकत्र येऊ शकतात अशा मदतीसाठी धावणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ. सचिन नांद्रे सर, डॉ. अजय पाटील सर, डॉ. डी. एन. सूर्यवंशी सर, डॉ. मनिष करंजे सर श्री. धिरज माळी सर यांची उपस्थिती होती. विशेष शिक्षक हेमंत महाजन सर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आव्हानांबद्दल व त्यांच्या क्षमता वाढविण्यात केलेले कार्य सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी तर मुख्याध्यापक मनीष जाधव यांनी आभार मानले.

