बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या –
प्रांतधिकारी यांना तालुक्यातील सरपंचांची निवेदनातून मागणी
अमळनेर :-
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये मस्साजोग गावातील लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची ता.९ डिसेंबर रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही मानवतेला काळीमा फासणारी असून राजकीय सुळातून अगोदर सरपंच यांचे अपहरण करण्यात आले. आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात भयावहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून जे जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही करून फाशीची शिक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन अमळनेर तालुक्यातील सरपंचांनी उपविभागीय अधिकारी यांना आज ता. 18 रोजी दिले. शासनाने यापुढे सरपंच यांची सुरक्षेचा महत्वाचा विषय असून असे कृत्य करणाऱ्यां नराधमाना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जेणेकरून यापुढे अशा घटना घडणार नाहीत.
याप्रसंगी तालुक्यातील सरपंच यात दामोदर खैरनार, राजीवकुमार पाटील, भैय्यासाहेब पाटील, मनिषा पाटील, केदारसिंग जाधव, पंकज निकम, नितीन बापूराव पाटील, विजूबाई कोळी, उमाकांत पाटील, नरेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, विजूबाई कोळी, अर्चना पाटील, इंदुबाई पाटील, कोकिळाबाई पाटील, तारकेश्वर पाटील, विवेक पाटील, डॉ.शशिकांत पाटील, चेतन पाटील, भारती पाटील, समाधान पारधी, रजनी पाटील आदींच्या या निवेदनावर स्वासऱ्या आहेत.

