दिव्यांग मुलांना शिरोळे परिवाराची मायेची ऊब,
वाढदिवसाला दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप —
पारोळा (प्रतिनिधी )
पारोळा येथील सावित्री फटाका फॅक्टरीचे संचालक उद्योजक श्री. विकास एकनाथ शिरोळे यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री तेजस विकास शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील शाळेत दिव्यांग मुलांना स्वेटर, किरकोळ किराणाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. विनोद धोत्रे, व मित्र परिवार उपस्थित होते.
आपल्या वाढदिवसाला गरजू मुलांना मायेची ऊब देऊन वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करणारे तेजस शिरोळे यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी त्यांचे कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव व उपमुख्याध्यापक हेमंत महाजन यांच्या हस्ते श्री.तेजस शिरोळे यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन जगदीश सोनवणे सर यांनी तर आभार प्रदर्शन हेमंत महाजन सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

