शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त पालखी सोहळा शोभायात्रा
अमळनेर :-
अमळनेरातील तेली समाजातर्फे ता.8 रोजी महाआरती व पालखी महोत्सव कार्यक्रम सकाळी नऊ वाजता संताजी मंदिर येथे सामूहिक पूजन झाले. दुपारी चार वाजता संताजी महाराज मंदिर,माळीवाडा,संताजी चौक येथे महाआरती व पालखी पूजन झाले नंतर पालखी शोभायात्रा संताजी चौक ,वाडी चौक, सराफ बाजार ,दगडी दरवाजा ,पाच कंदील चौक ते मुंबई गल्ली तेली भुवन,सुभाष चौक, कुंटे रोड, झामी चौक, माळीवाडा , संताजी मंदिर येथे श्री संताजी महाराज यांना अभिवादन करून शोभायात्राची सांगता करण्यात आली.या शोभा यात्रेत असंख्य महिलांचा सहभाग होता आणि तेली समाज युवक मंडळाचे सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी होते. तेली समाजाचे अध्यक्ष संजय सुदाम चौधरी ,सुरेश सखाराम चौधरी ,एकनाथ माधव चौधरी, अरुण धोंडू चौधरी ,अरुण नेरकर ,पराग चौधरी, सुरेश रतन चौधरी ,संजय भिकन चौधरी ,आबा नामदेव चौधरी, प्रा डॉ एस आर चौधरी, आत्माराम चौधरी, अशोक चौधरी, चौधरी , प्रा इ. टी.चौधरी,श्रीराम चौधरी , नाना रतन चौधरी, नंदलाल भगवान चौधरी, अरुण जगन्नाथ चौधरी, शांताराम नारायण चौधरी, शरद जगन्नाथ चौधरी, नामदेव चौधरी,धनु चौधरी,बळीराम चौधरी, लक्ष्मण चौधरी, नेरकर, हिम्मत चौधरी, सुनील चौधरी ,सोनू चौधरी, ललित चौधरी, जगदीश चौधरी जे के चौधरी ,सुधीर चौधरी, चैतन्य चौधरी समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

