परिश्रम मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केला सत्कार
दिव्यांग मुलांच्या कला-गुणांना वाव
पारोळा :-
आमच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील शाळेचे विद्यार्थी जागतिक दिव्यांग दिन व ता.८डिसेंबर जागतिक मतिमंद दिवस या निमित्ताने ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय विभाग मुंबई, दिव्यांग मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे , समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव,यांच्या वतीने चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, वैसाका श्रीमती माधुरी भागवत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.प्रमाणपत्र स्विकारताना शाळेचे मुख्याध्यापक मनिष किसन जाधव,व शिक्षक आर.एस.शेलकर,सविता पाटील, वैशाली पाटील, शिक्षकेतर कर्मचारी विवेक पाटील, कुणाल महाजन,राजू माळी,दिपक माळी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ योगेश रघुनाथ महाजन सर यांनी केले.

