वीज चोरी करणाऱ्यांना बिल भरा अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा
महावितरण कंपनीची विजचोरी करणाऱ्यावर कारवाई
अमळनेर:-
महावितरण कंपनीच्या पथकाने तालुक्यात वीज चोरी करणाऱ्यावर कारवाई केली आहे. वीज चोरी केलेले कार्यालयात तडजोड करून दिलेले वीज बिल भरा अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या विजचोरी शोध मोहिमें अंतर्गत अमळनेर उपविभाग-१ चे अति. कार्यकारी अभियंता टिकाराम नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर ग्रामिण १ कक्ष अंतर्गत सहाय्यक अभियंता विजय माळी, सहाय्यक अभियंता नेवाले, सहाय्यक अभियंता विनायक बोरसे, सैंदाणे, वाडीले, चव्हाण, प्र.तंत्रज्ञ प्रविण पाटील, कमलेश विसपुते, खंडू पाटील, दिनेश वाघ, एजाज शेख, स्वप्निल पाटील व इतर कर्मचारी याच्या पथकाची नेमणूक करून विजचोरी करणारे ग्राहक यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. संबंधित वीज चोरी करणारे ग्राहक यांना त्यांच्या वापर नुसार विजचोरीचे तसेच तडजोड रकमेचे बिल देण्यात आलेले आहेत. त्यांनी ते विजचोरीचे व तडजोड रकमेचे बिलाचा भरणा करावा. फाफोरे येथील युवराज आत्माराम पाटील, लताबाई सुरेश पाटील, आत्माराम मुरलीधर पाटील, शांताराम गरबड पाटील, पिंपळे येथील चैत्राम अवचित पाटील, निंबा नारायण चौधरी, कैलास रामराव पाटील, शिरुड येथील शांताबाई वामन पाटील, रंगरराव वामन माळी, जगन्नाथ हरी कुंभार, रत्नाबाई हिरामण पाटील, खोकरपाट येथील रणजित प्रकाश पाटील, मुक्त्यार्सिंग रणजितसिंग पाटील, कन्हेरे येथील रंगराव पुंडलिक पाटील, नंदकिशोर अरुण पाटील, व्यंकट गंगाराम पाटील, चुडामन तानकु पाटील, हिलाल पाटील, राजू नवल सोनवणे, अनिता राजू सोनवणे त्यांच्यावर वीज चोरीची कार्यवाही झाली असून तडजोड अंतर्गत यांना विजबिल दिले गेले असून त्यांनी तात्काळ ते महावितरण कार्यालयात भरावे. अन्यथा सबंधितांनी व्यक्तीन विरुद्ध पोलिस स्टेशन येथे भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे रीतसर फिर्याद दाखल करण्यात येईल असेही पत्रात नमूद केले आहे.

