तरुणाची नैराष्यात विहीरीत उडी घेत आत्महत्या!
अमळनेर:-
तरवाडे ता. अमळनेर येथील २३ वर्षीय तरुणाचा स्वतःचा मालकीच्या विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ता.९ रोजी उघडकीस आली आहे.
तालुक्यातील तरवाडे येथील सुनील निंबा पाटील (वय २३) हा तरुण टी.वाय.बीए.चे शिक्षण करून घरी शेती व्यवसाय करत होता. ता.९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुनील हा स्वतःचा मालकीच्या विहिरीत पडल्याचे समजल्याने गावातील लोकांनी त्याला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. सतीश पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पो.हे.कॉ.सुनील तेली हे करीत आहेत.

