महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष
अमळनेर :-
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार विराजमान झाल्याने अमळनेर येथे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार कार्यालया बाहेर फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले व आनंद साजरा केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य ऍड. व्ही. आर. पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे, महेश पाटील, देविदास देसले, वाल्मिक पाटील, भूषण पाटील, व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

