मंगरूळ येथील एमआयडीसीमध्ये तरुणाचा खून, पोलीसांची शोध मोहीम
अमळनेर :–
मंगरूळ येथील एमआयडीसीत रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.त्याच्या डोक्यावर मार लागलेला असून आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडल्याने त्याचा खून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुषार चिंधु चौधरी (रा. प्रताप मिल कंपाऊंड मूळ रा. मारवड) हा ५ रोजी रात्री बाहेर गेलेला होता. तो रात्री उशिरा पर्यंत परत आला नव्हता. सकाळी मंगरूळ येथील एमआयडीसीमध्ये तो मयत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर मार लागलेला दिसून आला. आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. पोलीस पाटील भागवत पाटील यांनी पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक बागुल, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील शोध प्रक्रिया सुरू आहे. पोलिस कारणांचा शोध घेताय. अजून कोण होत याचा शोध घेताय.

