पिंपळकोठे तांडा येथे उद्या ता. 1 रोजी प्लेग महाराजांचा यात्रौत्सव—-
माहेरवाशीन नवस फेडण्यासाठी दाखल —
अमळनेर :-
पिंपळकोठे तांडा ता. पारोळा येथील प्लेग महाराजांचा यात्रौत्सव उद्या ता.1 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. दोन दिवस अगोरच भाविक नवस फेडण्यासाठी दाखल झालेले पहावयास मिळत आहे.
दरवर्षी कार्तिक अमावस्येला हा यात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या यात्रौत्सवाला सुमारे दीडसे वर्षाची परंपरा असून त्याकाळी प्लेग आजाराची साथ पसरलेली असताना सर्वत्र मृत्यूचे भय पसरले होते. येथील वसंतनगर, भोलाणे, पिंपळकोठा गावातील ग्रामस्थांनी रोगालाच देव मानून त्याची स्थापना पिंपळकोठा व वसंतनगर या दोन्ही गावाच्या मध्यभागी केल्याने प्लेग आजाराची साथ आटोक्यात आली असेही सांगण्यात येते.
हा यात्रौत्सव मंदिर परिसरात तीन दिवस भरविला जातो. याठिकाणी पाळणा, खेळण्याची दुकानें, उपहारगृहे, संसारोपयोगी वस्तूंची दुकानें थाटलेली आहेत.
*हा यात्रौउत्सव माहेरवाशिनची दिवाळी*—-
हा यात्रौउत्सव येथील बंजारा समाजाचा सण म्हणून प्रसिद्ध आहे. येथील माहेरवाशिण दिवाळी सणाला येणार नाही परंतु या यात्रौउत्सवाला येतातच. याप्रसंगी प्रत्येक घरात पाहुण्यांची गर्दी होत असते. म्हणूनच तरुण मुले, मुलींची विवाह यावेळी ठरत असतात. बंजारा समाजाने या यात्रौउत्सवाची परंपरा आजही टिकवून ठेवली आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले बंजारा समाज बांधव हे यात्रौत्सवाला आपल्या गावी येतात. वसंतनगर, पिंपळकोठा, भोलाणे या तीन गावाची यात्रा असल्याने यावेळी मोठी गर्दीही होते.पिंपळकोठा येथील ग्रामस्थांनी लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले असून शांततेचे आवाहन येथील सरपंच, व ग्रामस्थांनी केले आहे.

