सामाजिक बांधिलकीची एक प्रेरणादायक कहाणी!
प्रा. श्याम पवार यांनी सानेगुरुजी स्मारक कर्मभूमीला दिले एक लाख ११ हजार रूपयाची देणगी..
अमळनेर :-
तालुक्याचे शेतकरी सह संघाचे माजी अध्यक्ष व मराठी वाङ्गय मंडळाचे संचालक प्रा. श्याम पवार यांनी साने गुरुजी स्मारक 1 लाख 11 हजार रुपये दान करून सामाजिक बांधिलकीची एक नवी उंची गाठली आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल साने गुरुजी स्मारक समितीने त्यांचे अभिनंदन केले आहे.
साने गुरुजींच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त, खान्देशात 125 प्रबोधनपर उपक्रम आणि स्मारकाच्या स्ट्रक्चरल हॉलच्या उभारणीचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे समाजात साने गुरुजींच्या मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यात मदत होईल. प्रा. श्याम पवार यांचा अनुभव आणि दातृत्व नेहमी स्मारकासाठी लाभदायक ठरला आहे. त्यांना विश्वास आहे की, स्मारकाच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांचा गुणात्मक विकास साधता येईल. महाराष्ट्रातील हे एकमेव स्मारक असेल, जे लोकांनी लोकांसाठी उभारले असेल.
सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 13 एकर खडकाळ जागेवर झाडांचे संगोपन सुरू आहे. या जागेत जैवविविधता टिकवण्याबरोबरच पाण्याच्या व्यवस्थापनाचे कामही मोठ्या उत्साहाने सुरु आहे. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान खान्देशातील तरुण शेतकरी महिलांच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशा दाखवत आहे. यामुळे दरवर्षी 300 हून अधिक तरुण यशस्वी श्रमसंस्कार छावणीत सहभागी होऊन त्यांच्या कौशल्यांचा विकास करत आहेत. या कार्यात सर्वांच्या आशीर्वाद, प्रेम, आणि सहकार्यातून नवी दिशा प्राप्त होईल, ह्या विश्वासाने काम पुढे जात राहील.प्रा. श्याम पवार यांच्या या दातृत्वाबद्दल साने गुरुजी स्मारक कर्मभूमीचे अध्यक्ष व सर्व मंडळ यांनी अभिनंदन केले आहे..

साने गुरुजी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. सराफ, कार्याध्यक्ष चेतन सोनार, कार्यवाह दर्शना पवार यांना 1 लाख 11 हजार चा चेक देतांना अमळनेर तालुका शेतकी संघाचे मा.अध्यक्ष प्रा. शाम पवार, शुभम पवार
