स्व. उदय वाघ यांना वाहिली सामूहिक आदरांजली
आमदार अनिल पाटील यांची उपस्थिती
अमळनेर:-
स्व. उदय वाघ यांच्या पाचव्या पुण्यस्मृती निमित्त अमळनेर येथिल धुळे रस्त्यावरील स्मारक स्थळी सामूहिक आदरांजली देण्यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते स्मारक स्थळी एकत्रित आल्यानंतर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण व प्रतिमा पूजन करण्यात आले.कार्यकर्त्यानी उदय बापु अमर रहे च्या घोषणा दिल्या.आमदार पाटील यांनी भावना व्यक्त करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देत बापु आजचा दिवस पाहायला तुम्ही हवे होते या शब्दात आदरांजली अर्पण केली.
यावेळी भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे शहर व ग्रामिण भाग तथा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.इतर पक्षासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील यावेळी उपस्थिती दिली. खासदार स्मिता वाघ या कामानिमित्त दिल्ली येथे असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह वाघ कुटुंबियांच्या अनुपस्थितीत हा स्मृती दिन घडवून आणला.
दरम्यान स्वर्गीय उदय वाघ हे भाजपासाठी कार्यकर्ता घडविणारे स्रोत होते,अमळनेर तालुका व मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा व परिसरात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केले होते,नावाप्रमाणेच राजकीय वर्तुळात वाघा सारखा दबदबा त्यांनी ठेवला होता.

