महेंद्र महाजन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा —
अमळनेर :-
अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सुदाम महाजन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महेंद्र महाजन यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात आवड असल्याने त्यांनी बऱ्याच स्तुत्य उपक्रमात आपले योगदान दिल्याने त्यांचा मित्र परिवार व गोतावळा मोठा आहे. काल ता. 28 रोजी श्री. महाजन यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर मित्र परिवारांनी भेटी देत शुभेच्छा दिल्या.
महेंद्र महाजन हे क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले विचार मंचाचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तर माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यांनी अंबरीश ऋषीं टेकडीवर जात दर्शन घेतले. सायंकाळी मित्रपरिवारासोबत वाढदिवस साजरा केला.

