वसंतनगर आश्रम शाळेत महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन !…
अमळनेर :-
आधुनिक भारताचे शिल्पकार, शिक्षणतज्ञ, विचारवंत, लेखक, स्त्री शिक्षणाचे आद्यजनक, क्रांतीसुर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेत अभिवादन करण्यात आले.
यावेळी माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एल. एस. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील,जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, डी. एस. पाटील,के. आर. पाटील, एम. डी. सूर्यवंशी, प्रा. हिरालाल पाटील, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. तिरुपतीकुमार वारुळे,प्रा. एस. के. देवरे, प्रा. एम. एन. कुवर यांनी प्रतिमा पूजन केले.
यावेळी प्रा. हिरालाल पाटील, विध्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एच. निकुंभे,कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य केले.

