लाडक्या बहिणींचा अनिल दादांना साथ, प्रचारातही घेतली बहिणींनी आघाडी –
अमळनेर– अमळनेर विधानसभा मतदारसंघात 60 वर्षात झाली नाही एवढी कामे गेल्या दीड वर्षात मंत्री अनिल पाटलांच्या माध्यमातून झाली आहेत, पाच वर्षांआधीचा काळ आठवा काय स्थिती होती, आताही येणारी उद्याची पिढी कसा विकास होणार याचा विचार आपल्याला करायचा असल्याचे लाडक्या बहिणींनी अनिल दादांच्या प्रचारात साथ देत गावा-गावात आघाडी घेत दमदार प्रचार त्यांनी केल्याने मंत्री अनिल पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असाही आत्मविश्वास लाडक्या बहिणींनी व्यक्त केला. दर्जेदर रस्ते, पायाभूत सुविधा, शेतीसिंचन व सामाजिक विकासाचा वादा आम्ही पुर्ण केला आहे.
राज्यात लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये महिना मिळाल्याने त्यांनाही मदत झाली आहे. आता पुन्हा आम्ही सत्तेत आल्यावर एकविसशे रुपये महिना देणार असून लाडकी बहीण हिला यामुळे मोठी मदत मिळेल. परिणामी अमळनेर विधानसभा मतदार संघात महिलांनी मंत्री अनिल पाटील यांना पाठींबा देत प्रचारात पुढाकार घेतला आहे. यात योगिता गुर्जर या ग्रामीण भागातील महिलानेही अनिल दादा यांचा प्रचारात उस्फुर्त सहभाग घेतला आहे.

.
