कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी
निकालाकडे सर्व्यांचे लक्ष —
अमळनेर
शहरातील टाकरखेडा रस्त्यावरील गोदामात मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली असून.मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.यात स्ट्राँग रुमला लागून केंद्रीय सुरक्षा बल,त्यानंतर राज्य राखीव पोलीस बल तर तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र पोलीस यांची सुरक्षा आहे.प्रत्येकी ८ तासांसाठी ३ राजपत्रित अधिकारी निरीक्षकाची भूमिका पार पडणार आहेत.केंद्रीय सुरक्षा बलाचे ६० जवान स्ट्रोंग रूम जवळ बंदोबस्ताला असून राज्य राखीव पोलीस दलाचे २४ जवान आहेत.संपूर्ण परिसराला सीसीटिव्ही यंत्रणेने जोडले असून त्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.
ता.२३ रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी एकूण २३ टेबल लावण्यात येणार आहेत.यात १४ टेबलवर एव्हीएम मशीन ची मतमोजणी,६ टेबल वर पोस्टल मतमोजणी तर उर्वरित ३ टेबलवर इटीपिबीएस मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असून प्रत्येक टेबलवर ३ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.सोबतच प्रत्येक टेबलसाठी एक सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती केली आहे.जवळपास १५० च्या वर कर्मचारी मत मोजणीसाठी नियुक्त केले आहेत.सकाळी ८ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरवात होईल तर ८.३० वाजेपासून प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन च्या मतमोजणीला सुरवात होणार आहे.एकूण २४ फेऱ्या होणार असून दुपारी १ वाजेपर्यंत अंतिम निकाल येऊ शकतो.
मतमोजणी केंद्रावर व शहरात निकालावेळी व निकालानंतर गर्दी व गोंधळ होऊ नये यासाठी १२ पोलीस अधिकारी व ११० पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जमावबंदी लागू करण्यात आलेली असल्याचे अमळनेर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सांगितले आहे.

