महाविकास आघाडीचे वाद चव्हाट्यावर
अमळनेर —
उमेदवारी मागण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील इच्छुकांची भाऊ गर्दी झाली असताना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. अशोक पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपजिल्हाधिकारी एच टी माळी होते.
त्याचप्रमाणे के.डी.पाटील यांनी एक अर्ज अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. के डी पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ ,तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी , डी. डी.पाटील , माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , मनोज पाटील , तुषार संदानशिव यांच्यासह काही कार्यकर्ते हजर होते.
महाविकास आघाडीचे वाद चव्हाट्यावर आले असून याचा फायदा विरोधी गटाला होणार असल्याचे चित्र आहे. सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

