खानदेश वैधानिक फोरम मार्फत पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न
अमळनेर :-
खानदेश वैधानिक विकास फोरम मार्फत भारतीय स्वातंत्र्याची 78 वर्षे निमित्त “माझ्या संकल्पनेतील माझा खानदेश” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा खानदेश स्तरावर म्हणजे धुळे,जळगाव, नंदुरबार जिल्ह्यासाठी आयोजित करण्यात आली होती. खुला गट, वरिष्ठ महाविद्यालयीन गट,आणि कनिष्ठ महाविद्यालयीन गट या तीन विभागातून ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिन्ही जिल्ह्यातून 78 निबंध आले होते. या निबंध स्पर्धेत खुल्या गटातून प्रथम क्रमांक श्री आनंदा बारका पाटील,द्वितीय क्रमांक , प्रा. डॉ. नितीन गिरधर शिंदे, तृतीय क्रमांक,श्री पंकज प्रतापराव शिंदे यांनी मिळविला आहे.
वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून कु. नेहा भरत पाटील प्रथम प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कु.संगमा सुधीर जाधव, तृतीय क्रमांक कु. कविता मधुकर अहिरे यांनी मिळविला आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून प्रथम क्रमांक अजय राजेंद्र तरवाडकर
द्वितीय क्रमांक प्रिन्सी निलेश साळवे,तर तृतीय क्रमांक आलाफिया आबिद शहा यांनी मिळवला आहे. सदरील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.एस.टी पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश वैधानिक फोरमचे अध्यक्ष प्रा विलासराव पाटील होते. याप्रसंगी व्यासपीठावर सातपुडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड सुधीर जाधव प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. के बी पाटील,प्राचार्य डॉ.प्रवीण सिंग गिरासे , काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार, रवींद्र चौधरी, खानदेश वैधानिक विकास फोरमचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. दीपक बाविस्कर, खानदेश फोरमचे सचिव प्रा. डॉ.संभाजी पाटील, प्रा. डॉ.आर के जाधव आदी उपस्थित होते .
उद्घाटनपर भाषणात डॉ. एस.टी.पाटील यांनी सांगितले की, खानदेशासाठी वैधानिक विकास फोरम ची स्थापना ही एक अभिमानाची गोष्ट असून या फोरमला भविष्यात निश्चितपणे शासनाकडून मोठे पाठबळ मिळू शकेल. त्या पद्धतीने हे वैद्याने फोरम वाटचाल करीत आहे. प्राचार्य डॉ के बी पाटील यांनी सांगितले की, हे खानदेश वैधानिक विकास फोरम समाज हितासाठी विधायक कार्य करीत आहे त्यामुळे या फोरमला चांगलं यश मिळेल. तर ऍडव्होकेट सुधीर जाधव यांनी सांगितले हे फोरम सामाजिक उपक्रम राबवित असून भविष्यात त्याचा विस्तार वाढवून त्याचे रूपांतर महामंडळात होईल त्यात तीळमात्र शंका नाही. त्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे चरित्र चांगले असले पाहिजे आजचे विद्यार्थी हे भविष्याचे नागरिक असून राष्ट्राची जडणघडण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे . आणि असेच विद्यार्थी राष्ट्राची सेवा करून समाजभान ठेवतात.
प्रा. डॉ. संभाजी पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की, महाराष्ट्रात वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्याच धर्तीवर खानदेशावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी खानदेश वैधानिक विकास फोरमची स्थापना करण्यात आली आहे. तसेच समाजातील अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांच्या संकल्पना आचार, विचार यांना कृतीशील रूप देण्यासाठी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. विलासराव पाटील यांनी सांगितले की, आम्ही खानदेशासाठी विधेयक स्वरूपाची कामे करणार आहोत. त्यासाठी समाजामध्ये जनजागृती करीत आहोत. कृषी शिक्षण सिंचन यांचा विकास करणे. तसेच नदीजोड प्रकल्पाची अंमल बजावणी होण्यासाठी जन संघटन करीत आहोत. खानदेशाला दुजाभावाची वागणूक मिळत आहे त्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक बाविस्कर यांनी केले तर आभार कविता अहिरे ने मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नामदेव पारखे, कैलास जाधव, सोनल राजपूत,रहीम खान, ऋषिकेश वाघ,विशाल गोपाळ, नरेंद्र फुलपगारे यांनी परिश्रम घेतलेत. या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाली.

