डॉ. अनिल शिंदे आज करतील उमेदवारी अर्ज दाखल
अमळनेर :–विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने अमळनेर विधानसभेसाठी डॉ. अनिल शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली असून ते महाविकास आघाडीचे अधिकृत असून उद्धव ठाकरे शिवसेना गट, शरद पवार राष्ट्रवादी गट काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह अमळनेर विधान सभा मतदार संघातील जनतेच्या उपस्थितीत आज ता. 29 रोजी सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी त्यांनी सर्व ताकतनीशी जोर लावत उमेदवारांच्या शर्यतीत डॉ अनिल शिंदे हेच मात्तब्बर ठरले आहेत.
आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख २९ ऑक्टोबर असल्याने डॉ. अनिल शिंदे २९ रोजी भरणार आहेत.

