कळमसरे येथे अनिल पाटील यांना गावभेटीत ग्रामस्थांचा प्रतिसाद-
अमळनेर ::- अमळनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी आहे. अनिल भाईदास पाटील यांना गावभेटी दरम्यान प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.अनिल पाटील पाच वर्षात कळमसरे सह परिसरात विकास कामे केली आहेत. कळमसरे गावाला अनिल पाटील यांनी 2 कोटी 76 लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून योजना पूर्णत्वाला आलेली आहे या योजनेमुळे कळमसरे गावाला खूप मोठा फायदा होणार असून पिण्याचा पाण्याची वणवण कायमची सुटणार असल्याने कळमसरे ग्रामस्थ आनंदी झाले आहे . पेवर ब्लॉक 20 लक्ष ,कॉक्रीट रस्ते 40 लक्ष,संरक्षण भिंत 5 लक्ष,तलाठी कार्यालय 26 लक्ष,माळी समाज मंगल कार्यालय 17 लक्ष,गावासाठी सभामंडप 20 लक्ष,दलित वस्ती 20 लक्ष अशी अनेक विकास कामे अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून झाली आहेत आज अनिल पाटील यांनी कळमसरे गावभेटी दरम्यान लोकांशी संवाद साधला मतदारसंघातील प्रत्येक गावांत करोडो रूपयाचा निधी देवून विकासकामे केल्याने मतदारांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. घरोघरी महीला वर्गाकडून त्यांचे औक्षण ही केले जात आहे. कळमसरे गावातील ग्रामस्थांनी अनिल पाटील यांना पुन्हा विजयी करू असा निर्धार केला आहे यावेळी माजी जि.प.सदस्य व्ही आर पाटील, कृउबा सभापती अशोक आधार पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील,सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत, विकास सोसायटी चेअरमन सुनील राजपूत,उमाकांत साळुंखे, योगेंद्रसिंग पाटील , सुदाम चौधरी, दिनेशसिंग पाटील, आबा महाजन,महेंद्र कोळी, रणजितसिंग पाटील,अंबालाल राजपूत,महमूद पठाण, भरत राजपूत, प्रकाश राजपूत शिवाजी दाजभाऊ, अनिल शिसोदे, विजू अप्पा,समाधान धनगर,राजेश बापू, भूषण भदाणे, विकास पाटील, भूषण पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

