तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन
कळमसरे ता. अमळनेर
अमळनेर तालुक्यात ता. 18 व ता. 19 रोजी तालुक्यातील आठही मंडळात सतत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने सरसकट पंचनामे करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले.
या पावसामुळे मका, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांना कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालूक्यातील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे अन्यथा पुढील महिन्यात होणाऱ्या विधान सभेच्या निवडणूकीत मतदानाचा बहिष्कार करु असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी काँग्रेस किसान सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील
