कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाई—
अमळनेर : तालुक्यातील कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची दिरंगाई व कर्तव्यात कसुरीमुळे १३५ शेतकऱ्यांचे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या ठिबक अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संताप व्यक्त करीत जाब विचारला.
शासनाकडून अमळनेर तालुक्यासाठी ४९४ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ४६ हजार रुपये अनुदान मंजूर होते. मात्र अमळनेर तालुक्यातील कृषी कार्यालयातील कृषी सहायकांच्या आपसातील वादामुळे वरिष्ठ पातळीवर याद्याच गेल्या नसल्याने सुमारे १३५ शेतकरी वंचित राहिले. ३५९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५ लाख १९ हजार ९५५ रुपये अनुदान मिळाले. वेळेवर याद्या न गेल्याने १३५ शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास १ कोटी ६५ लाख २६ हजार ४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत शेतकरी संतप्त होऊन तालुका कृषी कार्यालयावर येत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणाची व चुकीची माफी मागितली. मी तुमचा प्रस्ताव पाठवतो त्यावेळी शेतकऱ्यांनी साहेब आचारसंहिता सुरू आहे. आणि शासनाने इतक्या योजना मंजूर करून ठेवल्या आहेत तर अनुदान कसे मिळेल? असे सांगितले.
यावेळी संदीप पाटील ,संजय पवार , बाबूलाल पाटील , सुनील पाटील , मधुकर पाटील , जितेंद्र पाटील , कैलास पाटील , श्रीपाल झाबक , दिनेश पाटील , सुधीर पाटील , योगेश पाटील , बापूराव महाजन , चंद्रकांत पाटील , ज्ञानेश्वर पाटील , निंबा पाटील , उमेश साळुंखे , योगेश पाटील , विकास जाधव , हेमंत पाटील आदी हजर होते.
