डांगर येथे आदिवासी भिल समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप—-
अमळनेर —–
डांगर बुद्रुक ता. अमळनेर —येथे महसूल विभाग अमळनेर व तंट्या मामा पावन धाम डांगर बुद्रुक व विर एकलव्य युवा क्रांती मंडळ, राणी दुर्गावती महिला विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील 150 आदिवासी भिल समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धुडकू अभिमान पाटील हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी ग्रामसेविका सोनीताई पाटील, पोलीस पाटील सौ सुनंदाबाई खैरनार, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील, येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस व्ही पाटील तलाठी श्री एम आर पाटील , श्री महेंद्र पवार, श्री हंसराज मोरे, श्री राजू भाऊ भील, श्री मासुळे सर ,श्री संजय पाटील सर , श्रीमती सुरेखा पाटील पाटील, ग्रामपंचायत सदस्य चिंधाबाई सोनवणे, संगीता भिल, श्री राजेंद्र पाटील, श्री संतोष बैसाणे , श्री प्रकाश पाटील , श्री रामदास पाटील ,श्री किशोर पाटील, श्री प्रवीण पाटील , श्री राजू खैरनार, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.यावेळी शासकीय विविध योजना याविषयी माहिती दिली. समाज बांधवांनी, जातीचे दाखले मिळाल्याबद्दल प्रांतधिकारी महादेव खेडकर, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील , तलाठी, सर्कल सर्वांचे आभार मानले.
जातीचे दाखले मिळवण्यासाठी शांताराम सोनवणे सर, सुदाम सोनवणे, धोंडू सोनवणे , सागर सोनवणे,राज सोनवणे , विशाल मालचे, अनिल गांगुर्डे, यांचे सहकार्य झाले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम सोनवणे सर यांनी केले तर आभार सुदाम सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगलु सोनवणे, अशोक सोनवणे ,भावडू सोनवणे, सुरेश सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, नाना सोनवणे, भीमराज सोनवणे , जितेंद्र सोनवणे, सुपडू सोनवणे, मधुकर मोरे ,प्रल्हाद सोनवणे, संजय सोनवणे ,भिवा सोनवणे ,विजय सोनवणे, लक्ष्मण सोनवणे ,विठ्ठल सोनवणे, धनराज गोकुळ, देविदास मोरे, बाबुलाल सोनवणे, पिंटू सोनवणे , गोरख देवरे , जितेंद्र मोरे, राहुल मोरे, कैलास सोनवणे, दीपक सोनवणे, नानभाऊ सोनवणे, गणेश सोनवणे, दिलीप मालचे, रवींद्र पिंपळसे, मोतीलाल सोनवणे ,जगन कुवर, श्याम सोनवणे , सुनील मोरे, आप्पा सोनवणे , विशाल सोनवणे ,सागर सोनवणे , रवींद्र वाघ, आदींनी परिश्रम घेतले . कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
