

दिनांक २० मार्च २०२६ रोजी, सकाळी १.०० ते ४.०० वाजेच्या सुमारास, अमळनेर तालुक्यात वादळी वारा वाहत होता. या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण अंमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यात मका, गहू, दादर, बाजरी, ज्वारी, हरभरा तसेच कांदा, टोमॅटो आणि आंब्याचे देखील भरपूर नुकसान झालेले आहे. अमळनेर तालुक्यातील पूर्वेकडील भाग म्हणजे, पातोंडा, नांद्री, खवशी, पिंपळी, दहिवद, मठगव्हाण या भागात मका, दादर, ज्वारी, बाजरीच्या पिकांचा, शेतकऱ्यांच्या तोंडा त आलेला घास हिरावला गेला आहे. तालुक्यातील मका, दादर, बाजरी, ज्वारी चे पीक वादळी वाऱ्याने पूर्णतः आडवे झालेले असल्याने ते उभे राहण्याची शक्यता नाही. तसेच गहू कापणीस आलेला असल्याने पांढरा (पोट्या) पडण्याची भीती आहे व हरभरा देखील पक्व झालेला असल्याने, त्याचे घाटे जमिनीवर गळून पडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे 75% नुकसान झालेले आहे. तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. अमळनेर तालुक्यात सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात नुकसान झालेले असले तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मात्र नक्कीच फरक पडणार आहे. त्यासाठी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे महोदयांना निवेदन की, *तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे व्हावेत*. व उदास, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत मिळावी.
