
अमळनेर: खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर या नामवंत संस्थेच्या ‘प्रताप संवाद’ या शैक्षणिक मासिकाचे विमोचन आज देशाचे केंद्रीय कृषी मंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
या विशेष प्रसंगी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार तथा मंत्री रक्षाताई खडसे, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, मा.श्री. व्यंकैयाजी भागैय्या . (पूर्व सरसहकार्यवाह ) अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ., मा.श्री. बाळासाहेब चौधरी.
पश्चिम क्षेत्र कार्यवाह, श्री.मनोजभाई सोलंकी – अध्यक्ष अक्षय कृषी परिवार इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, या महत्त्वपूर्ण क्षणी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, ज्येष्ठ संचालक योगेश मुंदडे आणि इतर अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
*’प्रताप संवाद’ पत्रिकेची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे:*
1)मुख्य उद्देश: विद्यार्थी, माजी विद्यार्थी, अध्यापक आणि संस्था यांच्यात प्रभावी सुसंवाद प्रस्थापित करणे हे या मासिकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
२) ब्रीदवाक्य: “संकल्प एक, ध्येय अनेक, सुसंवादासाठीच हे लेख” या ब्रीदवाक्यावर ही पत्रिका आधारित आहे.
3)माहितीचे माध्यम: संस्थेमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे यश आणि शैक्षणिक घडामोडी प्रत्येक विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ई-मासिक सुरू करण्यात आले आहे.
4)डिजिटल स्वरूप: ही पत्रिका ऑनलाईन स्वरूपाची असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल.
५)अराजकीय धोरण: या शैक्षणिक मासिकात कोणत्याही प्रकारची राजकीय बातमी येणार नाही, याची विशेष दखल संस्थेकडून घेतली जाणार आहे.
*संस्थेचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल* यांनी व्यक्त केलेल्या भावनांनुसार, या सुसंवादातून विद्यार्थ्यांच्या करिअर आणि आयुष्याला उत्तम दिशा प्राप्त व्हावी हा यामागील खरा हेतू आहे. थेट देशाच्या केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते व अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत या पत्रिकेचे प्रकाशन झाल्याने, खान्देश शिक्षण मंडळाच्या या नव्या उपक्रमाला मोठी ऊर्जा मिळाली आहे.
