
सावित्रीबाई जेष्ठ महिला मंडळाने दिनांक 15 मार्च 26 रोजी रविवारी नांदेडकर हॉलमध्ये महिला दिवस साजरा केला त्यासाठी कार्यक्रमाचे वक्त्या म्हणून जळगावच्या प्रसिद्ध डॉक्टर स्वाती परीक्षित बाविस्कर व पाहुण्या म्हणून सौ.अनिता शिरीष चौधरी या होत्या.त्यांची ओळख सौ. सुरेखा बाविस्कर यांनी करून दिली. या वक्त्यांनी जेष्ठ महिलांचे घरातील स्थान किती महत्त्वाचे असते ते स्पष्ट करताना सासूबाईंनी माझ्या मुलीला कोरोना पिरियडमध्ये मी शिक्षण करीत असताना कसे सांभाळले ते उदाहरण देऊन ज्येष्ठांचे महत्त्व पटवून दिले. ज्येष्ठांनी त्यांची तब्येत व सौंदर्य कसे जपावे व त्यांचा आहार कसा असावा हे स्पष्ट केले .तसेच दुसऱ्या पाहुण्या सौ सुनीताताई शिरीष चौधरी यांनी सुद्धा महिलांशी हितगुज साधताना म्हणाल्या की – जेष्ठ महिला या घराचा कणा असतात ,त्यांच्यामुळे मुलांवर संस्कार होत असतात. म्हणून अशा व्यक्ती घरात असाव्यात वयोमानानुसार त्यांचा सांभाळ आपण केला पाहिजे असे त्यांनी मत स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले जेष्ठ मंडळाकडून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सौ.वसुंधरा लांडगे यांना पुरस्कार देण्यात आला . त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख प्रा.उषा पाटील यांनी करून दिली.पुरस्काराचे स्वरूप- मानपत्र , सावित्रीबाई फुलेंचा पुतळा , शाल ,श्रीफळ असे होते.
सौ वसुंधरा लांडगे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना डॉक्टर अपर्णा मुठे यांच्यानंतर मला हा दुसरा पुरस्कार मिळतोय याचा एक वेगळाच आनंद झाला आहे , असे म्हणून त्यांनी जेष्ठ महिला मंडळाचे आभार मानले.
योग्य अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला गेल्याचे समाधान अध्यक्षीय भाषणात सौ.कांचनताई शहा यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
त्यानंतर अमळनेर नगरपालिकेत नवनिर्वाचित नगरसेविकांचा व खा.शि. मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती माधुरी पाटील व कार्यकारणी सदस्या सौ.लीना पाटील या सगळ्यांचा मोगऱ्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला सौ योगिता कापडणेकर यांनी व माधुरी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, नगरसेविका कल्पना शर्मा यांनी आपल्या मनोगतात जेष्ठ नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले
सावित्रीबाई जेष्ठ महिला मंडळाने व्यसनमुक्ती वरील घोषवाक्याची स्पर्धा घेतली होती. त्याचे बक्षीस वाटप करण्यात आले. त्यातील पहिले बक्षीस अनुक्रमे पल्लवी बागुल, अरुणा अलई, योगिता कापडणे कर यांना व उत्तेजनार्थ भारती कोळी यांना मिळाले.
या कार्यक्रमाची सुरुवात “खरा तो एकची धर्म ” या प्रार्थनेने करून प्रास्ताविक सावित्रीबाई फुले जेष्ठ मंडळाच्या अध्यक्षा प्रा. शीला पाटील यांनी केले. त्यात त्यांनी मराठी वाड्मय मंडळाची ओळख करून देऊन जेष्ठ मंडळ स्थापन करण्याचा हेतू त्यांनी स्पष्ट केला. फेस्कॉम तर्फे अनेक सवलती जेष्ठांना शासनातर्फे दिल्या जातात हे सांगताना त्यांनी काही जेष्ठांविषयी अनुभव पण सांगितले. सौ गायत्री भदाने यांनी महिलांना शपथ दिली. रत्ना भदाणे यांनी आभार प्रदर्शन केले व संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर छान असे सूत्रसंचालन श्रीमती स्नेहा एकतारे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला.
या कार्यक्रमासाठी डॉ प्रा.शैलजा माहेश्वरी,सौ.मंगला चव्हाण, सौ.छाया पाटील,सौ.सुदर्शना पाटील ,सौ.आशा भदाने ,सौ.अलका गोसावी ,सौ.सुनंदा चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमास सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला नागरिक संघ व म.वा.मंडळाच्या सदस्य महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या
