
अमळनेर: येथील श्रीराम नवमी उत्सव समिती २०२६ च्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीच्या अध्यक्षपदी श्री. विजय महाजन (उर्फ रॉयल शेतकरी) आणि उपाध्यक्षपदी श्री. मनोज भाऊ ठाकरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल भाऊ बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. आगामी श्रीराम नवमीचा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यासाठी या दोन तरुण आणि कार्यक्षम नेतृत्वाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
*भक्तांकडून अभिनंदनाचा वर्षाव*
अमळनेर शहरातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या विजय महाजन आणि मनोज ठाकरे यांच्या निवडीमुळे श्रीराम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नियुक्ती जाहीर होताच सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांनी या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्षांचे आभार मानले असून, “यावर्षीचा श्रीराम नवमी उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नियोजन करू,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
