
आज दिनांक ११ मार्च २०२६, बुधवार रोजी सायंकाळी सुमारे ४:४५ वाजता अमळनेर ते धुळे या एसटी बसमध्ये प्रवास करत असताना शिवम् मानकर (रा. धुळे, मूळचे अमरावती) हे घाईगडबडीत आपली बॅग बसमध्येच विसरून उतरले. त्या *बॅगेमध्ये रु. २५००/- रोख रक्कम व अत्यंत महत्वाची कागदपत्रे* होती.
सदर प्रवासी धुळे येथे वाहतूक नियंत्रक कक्षात चौकशीसाठी जाणार तोपर्यंत ती बस पुढे धुळे ते जळगाव या मार्गाने निघून गेली होती. यावेळी धुळे आगाराचे चालक महेंद्र सनेर यांनी प्रवाशाची विचारपूस केली व तात्काळ मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
सनेर यांनी लगेच अमळनेर आगाराचे वाहक नितिन बागले यांच्याशी संपर्क साधला. नितिन बागले यांनी संबंधित बसचे वाहक बापू चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता प्रवाशाने सांगितलेल्या वर्णनानुसार ती बॅग बसमध्ये सापडली. बापू चौधरी यांनी ती बॅग रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह सुरक्षितपणे स्वतःच्या ताब्यात घेतली.
यानंतर प्रवासी शिवम् मानकर यांनी आपल्या घरी जवळील मित्राला फोन करून माहिती दिली. त्या मित्राने पारोळा बस स्थानकात जाऊन सदर बॅग रोख रक्कम व सर्व महत्वाच्या कागदपत्रांसह ताब्यात घेतली.
या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा व तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
*चालक महेंद्र सनेर, वाहक नितिन बागले व बापू चौधरी यांनी दाखवलेली जबाबदारी व प्रामाणिक सेवा निश्चितच कौतुकास्पद आहे
