
अतिशय खडतर असा हा शिक्षणाचा पहिल्या प्रयत्नात अगदी भरीव असे उज्वल यश संपादन केलं..
या साठी आमच्या या बाळाचे मनापासून आम्हीं कौतुक करतो…हार्दिक अभिनंदन देखील करितो…
अतिशय गरीब कष्टकरी घरातून आई व वडिलांनी या आमच्या समृद्धीस शिकवले व घडविले…
या समृद्धीचे वडील मित्र योगेश सुहागीर..राहणार..पैलाड..अमळनेर
समृद्धीची आई सौ ज्योती योगेश सुहागीर
यांनी या समृद्धी साठी अथक परिश्रम केलेत आपले हे ध्येय गाठणे या साठी या समृद्धी ने दिवसाचे 14..14..तास अभ्यास करून हे यश संपादन केलं…
अतिशय कष्ट परिश्रम मेहनत…सोबत आई व वडिलांची साथ म्हणून हे घडू शकले..
आमचा योगेश चां परिवार म्हणजे…
उभ्या खानदेशात संगीत वाद्य विक्री व दुरुस्ती साठी प्रसिद्ध..
उभ्या महाराष्ट्रातून नामांकित असे भजनी साहित्य… तंबोरा..एक तारी..ढोलकी..चिपळ्या.. सतार…गायन पेटी अश्या वस्तू या ठिकाणी मिळत असतात..वडिलांपासून परंपरागत असा हा व्यवसाय टिकून आहे..
अशा संगीत ज्या घरात वास करते…सर्वच साहित्य ज्या घरात अवतीभवती आहे.. अश्या ठिकाणी हा शिक्षणाचा उच्च वसा आज नावारूपास आला..
आमचे हे बाळ…या पुढे देखील उच्च भरारी घेत राहो…
अशा सदिच्छा आहेतच…
आम्हा अमळनेरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे…
पुन्हा अभिनंदन…
