
खड्डा चुकवताना अपघाताचा धोका वाढला; वाहनचालक त्रस्त, तात्काळ दुरुस्तीची जोरदार मागणी
अमळनेर तालुक्यातील जैतपिर–चौबारी दरम्यान राज्य मार्ग ६ वर असलेल्या रेल्वे फाटकाजवळ मोठा आणि धोकादायक खड्डा पडला असून काँक्रीटच्या सळया बाहेर दिसू लागल्या आहेत या परिस्थितीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जैतपिरकडील रस्त्यावर फाटकाजवळ एस-आकाराचे वळण असल्याने हा खड्डा लांबून दिसत नाही परिणामी वाहने अचानक खड्यात आदळतात. अनेक वाहनांच्या पाट्या, शॉक ऍबसोर्बरचे नुकसान होत असून प्रवाशांना जोरदार धक्के बसत आहेत
रेल्वे गेट बंद असताना दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात गेट उघडल्यानंतर एकाचवेळी वाहने सुटतात आणि खड्डा चुकवताना अचानक वळणे घेतली जातात. त्यामुळे शेजारच्या वाहनांना किंवा रेल्वे फाटकाला धक्के बसण्याचे प्रकार वाढले आहेत 😰. किरकोळ धडकांमुळे वादविवादही होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
खड्ड्यातील लोखंडी सळया घासल्या जाऊन तुटण्याची शक्यता असून वाहनांचे टायर फुटून गंभीर अपघात होऊ शकतात शिरपूर, शिंदखेडा, शहादा, नंदुरबार तसेच *सुरत* कडे जाणारी अवजड वाहने याच मार्गाने जात असल्याने धोका अधिकच वाढला आहे
स्थानिक गेटमन यांनी खड्ड्याबाबत रेल्वे प्रशासनाला कळविल्याचे सांगितले. मात्र हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या की रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येतो, याबाबत संभ्रम असल्याने दोन्ही विभागांकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे
“`दरम्यान, चोपडा व जळोद मार्गावरील रस्त्यांची कामे सुरू असल्याने मध्यप्रदेशात जाणारी तसेच नरडाणा सिमेंट फॅक्टरीकडे जाणारी अवजड वाहतूकही याच रेल्वे गेटवरून वळवण्यात आली आहे 🚜. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला असून अपघाताचा धोका अधिक गंभीर बनला आहे.“`
स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे . तसेच स्मिता वाघ आणि अनिल पाटील यांनीही त्वरित लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे
